केडगावात किरकोळ वादातून दगडफेक,अफवांमुळे परिसरात तणावाचे वातावरण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथे मंगळवारी (दि. २९) सायंकाळी दगडफेकीची घटना घडली असून या प्रकारामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोघे जखमी असून एक जणास ताब्यात घेतले असल्याचे समजते.अफवांमुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, केडगाव येथे पंचम वाईन्स या दुकानासमोर दोन जणांमध्ये गाडी धुण्याच्या कारणावरुन भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. त्यामुळे तेथे पळापळ झाली. या भांडणामुळे काही तणाव निर्माण होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस मोठ्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एक जणास ताब्यात घेतले असून दगडफेकीत दोेघे जण जखमी झाल्याचे समजते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.