सेनेचे माजी शहराध्यक्ष संभाजी कदमसह ११ शिवसैनिकांची जामीनावर सुटका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडा नंतर झालेल्या दगडफेक प्रकरणातील गुन्ह्यात महापौर सुरेखा कदम यांचे पती आणि सेनेचे माजी शहराध्यक्ष संभाजी कदमसह अकरा जण कोतवाली पोलिस स्टेशनला हजर झाले या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

या गुन्ह्यातील आरोपी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी अशोक कदम, विशाल संजय वालकर, सचिन चंद्रशेखर शिंदे, आशा संजय निंबाळकर, कुणाल उर्फ बंटी खैरे, सागर विष्णू थोरात, प्रशांत बाळु गायकवाड, अभिषेक कैलास भोसले, आदिनाथ राजू जाधव, सदाशिव काळे आणि तेजस सतीश गुंदेचा हे मंगळवारी (दि. २९) सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने ११ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींच्या वतीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असता न्यायालयाने प्रत्येकी २५ हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.