आ.संग्राम जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आ.संग्राम जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरिता शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्तेसह विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप पोटदुखीने त्रस्त असून, मागील काही दिवसापासून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. सदरील आरोपातून आ.जगताप लवकरच निर्दोष मुक्त होवून, शहराच्या विकासात्मक कार्यात पुन्हा सक्रीय होतील अशी आशा नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.