महापौरपती संभाजी कदमसह ११ शिवसैनिकांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडा नंतर झालेल्या दगडफेक प्रकरणातील गुन्ह्यात महापौर सुरेखा कदम यांचे पती आणि सेनेचे माजी शहराध्यक्ष संभाजी कदमसह अकरा जण कोतवाली पोलिस स्टेशनला हजर झाले या सर्वांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

या ११ जणांमध्ये माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विशाल वालकर, सचिन शिंदे, आशा निंबाळकर, सागर थोरात, प्रशांत गायकवाड, अभिषेक भोसले, आदिनाथ जाधव, उमेश काळे, तेजस गुंदेचा यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवार दि. ७ एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांड झाले. त्यामध्ये संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचे केडगावमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. 

यावेळी जमावाने पोलिसांच्या वाहनांवर थेट दगडफेक करुन नगर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. या हल्ल्यात पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळसह मारहाण झाली होती. या हल्ल्यात सेनेचे अनिल राठोड यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश असलेल्या 600 जणांवर गुन्हे दाखल झाले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.