पाऊले चालती पंढरीची वाट,या वर्षीचा वारीचा कार्यक्रम जाहीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंढरीच्या वारीचा यावर्षीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ६ जुलै रोजी ज्ञानोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीहून होणार आहे. तर तुकोबारायांची पालखी ५ जुलै रोजी देहूमधून प्रस्थान ठेवेल.

१७ दिवसांचा प्रवास करून या पालख्या पंढरपूरमध्ये आषाढीच्या पूर्वसंध्येला म्हणजेत २२ जुलै रोजी पंढरपुरात पोहचतील. २३ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.

माऊलींच्या पालखीचा कार्यक्रम

6 जुलै- आळंदीतून पालखीचं प्रस्थान

7 आणि 8 जुलै- पुणे मुक्काम

9 आणि 10 जुलै- सासवड मुक्काम

11 जुलै -जेजुरी मुक्काम

12 जुलै- वाल्हे मुक्काम

13 जुलै - निरा स्नान करुन लोणंदला पालखी मुक्काम

14 जुलै - लोणंदला (चांदोबाचा लिंब) पहिले उभे रिंगण

15 जुलै- फलटण मुक्काम

16 जुलै- बरड मुक्काम

17 जुलै- माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

17 जुलै- नातेपुते मुक्काम

18 जुलै- मांडवी ओढाला (पुरंदावडे) पहिलं गोल रिंगण

19 जुलै-खुडूस (ज्ञानेश्वर नगर-विझोरी) इथं दुसरे गोल रिंगण

पालखी वेळापूरला विसावणार

20 जुलै- तोंडले-बोंडले इथं तिसरे गोल रिंगण

पालखी भंडीशेगांव मुक्कामी

21 जुलै- भंडीशेगांवचे उभे रिंगण

बाजीराव विहिरीवर गोल रिंगण सोहळा

22 जुलै- माऊलींच्या पादुकांचे उभे रिंगण

पालखीचा पंढरीनगरीत प्रवेश

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.