दिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे,भाजपचे उंबरठे झिजवले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आंदोलनाची नौटंकी करण्याची दिगंबर ढवण यांची सवय आहे. सावेडी कचरा डेपोची आग विझविण्यास सुरुवात झाल्यानंतर हे मनपावर मोर्चा घेऊन आले होते. जिल्हाधिकारी व महापौरांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना केल्या. त्यांना याची संपूर्ण कल्पना असतानाही केवळ माझ्यामुळे प्रश्न मार्गी लागला, असे दाखविण्यासाठी त्यांनी आंदोलनाची नौटंकी केली. 

त्यातही प्रशासनाशी चर्चा होऊन प्रश्नमार्गी लागला होता. त्यानंतर पुन्हा महापौर दालनात त्यांनी तमाशा केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे म्हणणाऱ्या ढवण यांना महापौरांसमोर अरेरावी करताना बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण झाली नाही का?, असा प्रतिप्रश्न माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी ढवण यांना केला आहे. 

कदम हे काँग्रेसचे असल्याचे व काँग्रेस व राष्ट्रवादीची सेटलमेंट करत असल्याचे बेछूट आरोप करणाऱ्याने आधी पूर्ण माहिती द्यावी. ज्यावेळी शिवसेना फुटली. त्यावेळी शिवसेनेत आपण प्रवेश करत राजकारणात पाऊल टाकले. त्यानंतर शहरप्रमुख म्हणून या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासारखी माझी पदावरून हकालपट्टी झाली नाही. त्यामुळे यापुढे दिंगबर ढवण यांनी आरोप करताना याचे भान ठेवावे, असाही सल्ला कदम यांनी दिला आहे. 

दिगंबर ढवण यांना भाजपचे डोहाळे
पक्षाला अपक्ष लढण्याची धमकी देणाऱ्यांनी पक्षाची चिंता करण्याचे कारण नाही आणि गरजही नाही. सर्वसामान्यांच्या बळावरच हा पक्ष उभा आहे. यापूर्वी आपण अपक्ष लढलेले असतानाही काय निकाल लागला होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तसेच गेल्या ५-१० महिन्यांपासून ज्यांना भाजप प्रवेशाची डोहाळे लागले आहेत. त्यांनी भाजप प्रदेशाचे उंबरठे झिजवले. त्यांनी इतर सेटलमेंटचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असेही संभाजी कदम यांनी पत्रकात ढवण यांच्याविषयी बोलले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.