विवहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील एका विवाहित महिलेचा शारिरीक व मानसिक छळ करून तीस आत्महत्येस प्रवृत्त केले. यामध्ये विवाहितेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पतीसह सासू, सासरा व नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी गजानन कराळे (वय १९) ही गजानन बबन कराळे (पती), बबन रघुनाथ कराळे (सासरा), जनाबाई बबन कराळे (सासू) यांच्या सोबत हनुमानवाडी येथे राहात होती. पती व सासू सासरे तीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तीस वारंवार लाथाबुक्क्यांनी मारहान करून शिवीगाळ करत असत. 

त्यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी माहेरहुन ५० हजार रूपये घेवुन येण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. यामध्ये नंदिनी हीचा मृत्यू झाला. २० एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

 ज्ञानेश्वर नामदेव सपकळ (वय ४५, रा. मुळगाव मेनगाव, ता. जामनेर, हल्ली रा. गणेशनगर १, प्लॉट नं. २४/२५, निरगली, लिंबायत, सुरत, गुजरात) यांच्या फिर्यादीवरून २८ मे २०१८ रोजी पती, सासरा, सासू, तसेच सरला रवींद्र उखापाटील (रा. अमंळनेर, जि. जळगाव), बायडी भैय्या पाटी (रा. करंगी, ता. पाचोरा) यांच्यावर भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.