अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर परिसरातील मामेखेल येथील शासकीय आश्रमशाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना बुधवार दि. २१ मार्च २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी जयाराम बबन घोडे (वय ३०, रा. चास, ता. अकोले) हा सध्या तो संगमनेर तालुक्याच्या जवळे बाळेश्वर परिसरात असणाऱ्या मामेखेल येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बुधवार दि. २१ मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आश्रमशाळेतीलच अल्पवयीन विद्यार्थीनीला प्रकल्पाची फाईल माझ्या राहत्या खोलीत घेऊन ये, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थीनी फाईल घेऊन आली असता त्यावेळी घोडे याने खोलीचा दरवाजा बंद करुन या मुलीवर अत्याचार केला.

त्यावेळी ही विद्यार्थीनी घाबरली होती. त्यामुळे तिने कोणाला काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी लागल्याने ती तिच्या घरी आनंदवाडी येथे आली. त्यानंतरही शिक्षकाने दोन ते तीन वेळा फोन करुन तिच्याशी आक्षेपार्ह गप्पा मारल्या. ते संभाषण या विद्यार्थीनीने फोनमध्ये रेकॉर्ड करुन ठेवले आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकाराविषयी तु कोणालाही काही सांगू नको, नाहीतर तुझ्याकडे पाहून घेईल, अशी दमदाटीही केली.

त्यामुळे याप्रकरणी या अल्पवयीन विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी जयाराम बबन घोडे याच्या विरुद्ध गु.रजि.नं. ७५/२०१८ भा.द.वि. कलम ३७६ (२) (फ) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.