महादेव जानकर व राम शिंदे मंत्री आहेत, तोपर्यंत धनगर समाज़ाला अरक्षण नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जोपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ना. महादेव जानकर व पालकमंत्री प्रा. राम शिंदे आहेत, तोपर्यंत धनगर समाज़ाला अरक्षण मिळणार नाही, असा आरोप बहुजन एकता परिषदेची अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत केला आहे. 

पालकमंत्री ना. शिंदे यांनी अहिल्यादेवी यांची चौंडी येथील होणारी जयंती हायजॅक केली आहे. बहुजन समाज़ाच्या वतीने करण्यात येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आम्ही चौंडी येथेच साजरी करणार आहोत. यासाठी आम्हाला तुरुंगात ज़ाण्याची वेळ आली तरी चालेल, असे भिसे म्हणाले.

जामखेड पोलिसांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करू नये, यासाठी बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना १४९ ची नोटीस जारी केली आहे. त्या अनुषंगाने डॉ. भिसे यांनी दि. २८ रोजी सायंकाळी जामखेड येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते.


भिसे पुढे म्हणाले, येत्या ३१ तारखेला तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव मोठ्या थाटात होत आहे. या कार्यक्रमास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवाची पालकमंत्री राम शिंदे सध्या जोरदार तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा कामाला लावलेली दिसत आहे.

याच पर्वभूमीवर धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनीदेखील चौंडी येथे दुसऱ्या ठिकाणी बहुजन समाजाला एकत्रित घेऊन जयंती साजरी करण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांना १४९ ची नोटीस बज़ावली होती.

आम्ही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साज़री करून नये म्हणून आपल्या नोटीस बज़ावण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील आम्ही १० हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून चोंडी येथेच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करणारच आहोत, असे ते शेवटी म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.