निवडणुकीचा विजय साजरा करताना महिलेस मारहाण, शिवीगाळ करत विनयभंग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात ग्रामपंचायत निवडणूक विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून विनयभंग केला. या वेळी झालेल्या झटापटीमध्ये महिलेच्या गळ्यातील गंठण व हातातील सोन्याची अंगठी हरवली,याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल कला आहे.

निवडणुकीचा विजय साजरा करताना महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात एका ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी दुपारी घडला. पोलिसांनी याबाबत अकरा जणांविरुध्द गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, नुकसान करणे, शिवीगाळ करून धमकी देणे, याबाबत गुन्हा नोंदविला आहे.

तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी सकाळी लागला. विजयी झालेल्या उमेदवारांचे समर्थकांनी गावातीलच एका हॉटेलवर जाऊन तेथील महिलेचा विनयभंग केला. तसेच तिला मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली. महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

मी कोणत्याही पक्षाची नाही. माझ्या हॉटेलवर येऊन अकरा युवकांनी धिंगाणा घातला. मला मारहाण केली. माझ्या गळ्यातील मिनी गंठण व हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाली आहे. तसेच हॉटेलचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.