राष्ट्रीयतेचा अभाव असल्याने हिंदू स्त्री आणि पुरुष राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक - संभाजी भिडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीयांमध्ये राष्ट्रीयतेचा अभाव असल्याने हिंदू स्त्री आणि पुरुष राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक असल्याचं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी जळगावमध्ये केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

चीन आणि पाकिस्तान हे भारताचे नंबर एकचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात हिंदूंनी एकजुटीने उभं राहायाला हवं. हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे काहीच कळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जळगावमध्ये जमललेल्या धारकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारताचे खरे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत. त्यांच्या विरोधात भारताने एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. मात्र भारतात तसे होताना दिसत नाही. सीमेवर आपले जवान शहीद होत असताना, आम्ही पाकशी क्रिकेट सामने खेळतो. सणावाराला वाघा बॉर्डरवर त्यांना मिठाई द्यायला जातो, असे भिडे म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.