मॉन्सून 10 जून पर्यंत महाराष्ट्रात येणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची आगेकूच वेगात सुरू असून मान्सून केरळच्या वेशीवर आला आहे. 7 ते 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यावर्षी सरासरी एवढा पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने याआधीच व्यक्त केला होता.

आधीच्या अंदाजापेक्षा आठवडाभर लवकर मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल असाही अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मॉन्सून तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली असून शेतकरी जोरात तयारीला लगाले आहेत. तर कोकणात मच्छीमारांनी आपला हंगाम आवरता घेतलाय. येत्या 1 जून पासून ते 31 जुलै पर्यंत राज्यात सर्व प्रकारच्या मासेमारीला बंदी राहणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.