भानुदास कोतकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी ४ जून पर्यंत पुढे ढकलली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी भानुदास कोतकर यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी दि. ४ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या अर्जावर न्यायालयाने सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यात सांगितले आहे.

केडगाव येथे मनपा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दि. ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कट करुन खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने त्याची रवानगी नगरच्या सबजेल कारागृहात करण्यात आली आहे.कोतकर याला विशेष पथकाने येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला असता १४ मे रोजी अटक केली होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.