रामदेवबाबांच्या पतंजलीची दूरसंचार क्षेत्रात धडाकेबाज एन्ट्री,स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ लॉन्च !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योगसमुहाने दूरसंचार क्षेत्रात धडाकेबाज एन्ट्री केली आहे.पतंजलीने सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल BSNL) या दूरसंचार कंपनीबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत पतंजलीने ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ लॉन्च केले आहे. 

सध्या हे सीम कार्ड पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी लॉंच करण्यात आले आहे. मात्र पुढील महिनाभरात ते सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सुरवातीलाच ऑफर्सचा धडाका !
पतंजलीचे ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ घेतल्यानंतर ग्राहकास रोज २ जीबी डाटाबरोबरच जीवन वीमा व इन्शुरन्सही मिळणार आहे. हे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना २.५ लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स व ५ लाख रुपयांचा जीवन विमा मिळणार आहे.पतंजलीच्या ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’वर काही ऑफरही देण्यात आल्या आहेत. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ वापरणाऱ्या ग्राहकांना पतंजलीच्या सर्व उत्पादनांवर १० टक्के सवलतही मिळणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.