पाईपलाईन टाकण्यावरून वाद,एकास मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे शेतात पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून वाद होवून एकास जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश प्रल्हाद चोभे (वय ३५, रा. बाबुर्डी बेंद) हे शनिवार दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वा.आपल्या शेतात गेले असता मनोज उर्फ दत्तात्रय बाजीराव चोभे यांच्या सांगण्यावरून गणेश यांच्या शेतात पाईपलाईन नेण्याकरता एका जेसीबीच्या सहाय्याने उभ्या उसाच्या शेतात पाईपलाईन उकरताना दिसला. 

यावेळी चोभे यांनी ड्रायव्हरला शेतातून पाईपलाईन खोदू नको असे म्हणत काम बंद केले असता मनोज चोभे तेथे आले व त्यांनी गणेश यांना तुला काय करायच आम्ही कोठूनही पाईपलाईन खोदू असे म्हणून शिवीगाळ करत लोखंडी टॉमिने मारहाण करून दुखापत केली.तसेच तात्या अशोक चोभे याने काठीने मारहाण केली तर बाजीराव माधव चोभे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गणेश चोभे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.