जनसंपर्क कार्यालयाजवळील 'त्या'स्वयंघोषीत स्वियसहाय्यकांचा बंदोबस्त करा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ स्वयंघोषीत स्विय सहाय्यकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षा रक्षक व कार्यालयातील कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या या तथाकथीत स्विय सहाय्यकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी केली आहे.

याबाबत बोलताना नीलेश कोते यांनी म्हटले आहे की, आपल्या मर्जीतील पाहुण्यांना झटपट साईदर्शन घडविण्यासाठी साईबाबा मंदिर परिसरात अनेकांचे स्विय सहाय्यक सकाळ, सायंकाळ फिरत असतात. शिर्डीत येणाऱ्या व्हीआयपी भक्तांची संख्या अधिक असल्याने अनेकांनी आपल्या पीएंची नेमणूक खास साईदर्शन घडवून देणे याकामासाठी केलेली आहे. यात तथाकथीत पीएंची संख्या वाढली आहे. 

खरोखर हे पीए आहेत की, कोणाच्या तरी नावाचा वापर करुन आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या नावाचा वापर करतात हे समजत नाही. एकाच व्यक्तींचे अनेक पिए असल्याचे या ठिकाणी दिसून येतात त्यामुळे खरे कोण, खोटे कोण असा प्रश्न पडतो.

गर्दीच्या काळात जनसंपर्क कार्यालयाजवळ पेडपास घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. यावेळी आपल्या पाहुण्यांना रांगेत उभे कसे करायचे, त्यांना कमी वेळात दर्शन घडवून देण्यासाठी या पिएंची धडपड चालू असते. जनसंपर्क कार्यालया बाहेर असणाऱ्या सुरक्षा रक्षकास दमबाजी करुन आतील कर्मचाऱ्यांना झटपट पास देण्याचे आदेश करतात. 

या ठिकाणी गर्दीच्या काळात नेहमी वाद होताना दिसतात. साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या पिएंसंदर्भात एक नियमावली करुन या ठिकाणी बेशिस्त व नेहमी वाद घालणाऱ्यांना शिस्त लावावी व त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.