संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद होईनात ,गोवंश जनावरांच्या कत्तली सुरुच !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहर पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार हाती घेताच काही तासातच नव्या निरीक्षकांनी मदिना नगरमध्ये कत्तलीसाठी बांधलेली चार जिवंत जनावरांना जीवदान दिले. 

संगमनेर पोलिसांनी शेकड्यावर कारवाया करुनदेखील शहरातील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. शहरात गोवंश जनावरांच्या कत्तली सुरुच आहेत. यासंदर्भात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले अहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.