संगमनेर मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

                     

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना घारगाव पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील साकूरमध्ये ही घटना घडली. 

पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी साकूर परिसरातील बनाई देवी मंदिराजवळील वडिलांच्या मालकीच्या शेतात घास कापत असताना अजय शांताराम जाधव आणि विठ्ठल बाळू सोनवणे तेथे आले. त्यांनी वेगळा आवाज काढून पीडितेचे लक्ष वेधले. जाधव याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन सुरू केल्यावर मुलगी ओरडू लागली. 

दुसऱ्या आरोपीने तिला दरडावत ओरडल्यास मारण्याची धमकी दिली. ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे आईवडील धावत आल्याने दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दिलीप निघोट तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.