कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदाराचा अपघातात मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्नाटकमधील जामखंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं कार अपघातात निधन झालं. बंगळुरुहून आपल्या गावी जात असताना इन्होवा गाडीचा टायर फुटून कठड्यावर धडकल्यामुळे अपघात झाला. न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन मुली आहेत.

७० वर्षीय न्यामगौडा हे दिल्लीला गेले होते. तेथून विमानाने ते गोव्याला आले. गोव्याहून ते कारने आपल्या घरी येत होते. त्याचवेळी त्यांच्या कारला तुलसीगिरी येथे अपघात झाला.या अपघातात सिद्धू न्यामगौडा यांचे अन्य तीन साथीदारही जखमी झाले आहेत. न्यामगौडा यांनी भाजपचे उमेदवार श्रीकांत सुब्बराव कुलकर्णी यांचा २५००हून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला होता. त्यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात (१९९०-९१) केंद्रात मंत्रिपद भूषवले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.