पंधरा वर्षापासून अंधारलेले भिंगार येथील बीएसएनएल कॉलनी परिसर पथदिव्यांनी उजळले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चौदा ते पंधरा वर्षापासून अंधारलेले भिंगार येथील तरण विहार कॉटर बीएसएनएल कॉलनीतील परिसर पथदिव्यांनी उजळले. भिंगार कॅन्टोमेंन्टचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद यांच्या विकास निधीतून पथदिवे बसवून हा प्रश्‍न मार्गी लागला. नुकतेच या पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.

भिंगार येथील प्रभाग क्रमांक 3 मधील तरण विहार कॉटर बीएसएनएल कॉलनी परिसरात अनेक वर्षापासून पथदिवे नसल्याने या परिसरात अंधाराचा फायदा घेत चोर्‍या, लुटमार, चेनस्नॅचिंग व मुलींची छेडछाडचे प्रमाण वाढले होते. या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

या रस्त्याचे काम देखील आ.संग्राम जगाताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले. पथदिव्यांचा प्रश्‍न नागरिकांनी कॅन्टोमेंन्टचे उपाध्यक्ष सय्यद यांच्याकडे मांडले असता त्यांनी तातडीने दखल घेत पाठपुरावा करुन हा प्रश्‍न मार्गी लावला.

या पथदिव्यांचा शुभारंभ प्रभागातील महिला पार्वती महापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद, अनिता पाखरे, मीनल परनाटे, येडूबाई कारले, विमल टकले, कल्पना काळे, लक्ष्मी पारधे, फईम शेख, गोविंद जोशी, मयूर पारधे, विनोद काशले, प्रवीण कारले, विशाल नवले, सौरभ बेग, अमित इंगळे, प्रतीक थोरात, कलीम शेख, महमूद पठाण आदिंसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.