स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा.गांधींच्या निवासस्थानी दुध अभिषेक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुध दरवाढ तसेच पेट्रोल,डीझेल चे भाव कमी होण्याच्या मागणीसाठी खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी दुध अभिषेक घालून सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. 


या दोन्ही प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार गांधी यांच्या घरासमोर दगडाला अभिषेक घालून सरकारी दूधधोरणाचा निषेध करण्यात आला.


यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, स्वप्नील खाडे ,हनुमान उगले ,अशोक गायकवाड ,भीमराव लेंडे, दत्ता फुंडे ,शरद मरकड, प्रतापराव पठारी ,शकर राव लहारे,ज्ञानेश्वर सोडनार उत्तर अध्यक्ष ,शँकर सुरवसे ,नवनाथ बडे आदी सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.