१ जूनपासून बळीराजा पुन्हा संपावर, भाजीपाला,दूध,जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा थांबविणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- १ जून ते १० जून २०१८ या काळात राज्यातील शेतकरी पुन्हा संपावर जात आहेत. यात किसान क्रांती महाराष्ट्र, राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंच यांच्यासह देशातील १०० हुन अधिक शेतकऱ्यांच्या संघटना सहभागी होणार असल्याची माहिती किसान क्रांती संघटनेच्या ॲड. कमल सावंत यांनी दिली. 

याबबत आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. सावंत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी मागील वर्षी संपावर गेले होते. त्याची सुरुवात पुणतांबा येथून झाली होती. किसान क्रांती संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाची ठिणगी याच जिल्ह्यात पडल्यानंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. 

त्यावेळी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्यात सरसकट संपूर्ण कर्जमाफी, शेतीपुरक व्यवसायांना मदत, ठिबक सिंचन, ग्रीन हाउसला प्रोत्साहन व शेतीमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भावावर आधारित बाजार भावाची हमी, शेतकऱ्यांच्या पत्नीसह निवृत्ती वेतन कायदा करणे, दुधाला कमीत कमी ५० रुपये लिटर हमी भाव देण्याचा कायदा करणे, शेती उत्पन्नातील जोखमीचा (ईमा) कायदा करणे, बैलगाडा शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता देणे, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकरी संप केला होता. 

शेतकऱ्यांची फसवणूक झाली
संप शासनाने मागे घेताना अनेक आश्वासन दिली, त्यास आज एक वर्ष पूर्ण होऊनसुद्धा कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली गेली नाही. यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली किसान क्रांतीसह राज्यातील सर्व शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. 

जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित
१ जूनपासून मोठ्या शहरांचा भाजीपाला, दूध अशा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित करायचा आहे. शांततेच्या मार्गाने व गनिमी काव्याने हा संप करताना कोणताही शेतमाल रस्त्यात न टाकता अहिंसक मार्गाने करायचा आहे, असे आवाहन किसान क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.