तब्बल ११ वर्षांनंतर सोनम-रणबीर दिसणार एकत्र !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा आगामी 'संजू' या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. रणबीर कपूर चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर एकटाच काही हटके अंदाजात दिसला होता. आता मात्र त्याच्यासोबत या नव्या पोस्टरमध्ये सोनम कपूर दिसत आहे. 

सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांनी सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पहिले पाऊल टाकले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ११ वर्षांहून अधिक वर्षं झाली आहेत. त्यानंतर हे दोघे कधीच चित्रपटात एकत्र झळकले नाही. आता सोनम आणि रणबीर कपूर 'संजू' या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.