पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने पंकजा मुंडे अस्वस्थ ! भाजपला दिला घरचा आहेर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने विरोधक असताना मला अस्वस्थता वाटायची. आता सत्तेत असतानाही याबाबत अस्वस्थता जाणवते, असे वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 


मोदी सरकारच्या चार वर्षे पूर्तीनिमित्त पंकजा मुंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

इंधनावरील कराचे दर कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील तसेच त्याचा जीएसटीत समावेश करता येईल का, यावर केंद्र सरकारसोबत मुख्यमंत्री बोलणी करून दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.