राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याच्या मागणीसाठी मुंबईत टाॅवरवर चढला तरुण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं यासाठी एका एक व्यक्ती दादर येथील टिटी पुलावरील टाॅवर चढलाय.शाम गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून तो स्वत : शिवसैनिक असल्याचं सांगतोय. शाम गायकवाड हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने एक पत्रक प्रसिद्ध केलंय.सुमारे तासभर या तरुणाने पुलावर ठाण मांडली होती आणि पुलावरुन उडी मारण्याची धमकीही श्याम देत होता.
अखेर तासाभराच्या ड्राम्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाची गाडी आली. मग भल्या मोठ्या शिडीद्वारे अग्निशमन जवान त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला खाली उतरवलं. यावेळी त्याने राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही वाटली आणि अखेर त्याला पोलिसांनी अटकही केली.

कोण आहे आंदोलन करणारा तरुण?
आंदोलन करणारा हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील इसापूर गावचा आहे. दिग्रसमध्येही त्याने आधी पोलीस स्टेशनमधील टॉवरवर चढून अनेकदा आंदोलन केलं आहे. त्याने दिग्रसच्या तहसीलदारांना स्वत:सह कोंडून घेतलं होतं. 2012 मध्ये याने भाजपच्या तिकिटावर मांडवा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढली होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.