विजवाहक तार पडल्याने श्रीगोंद्यात लाखोंचे नुकसान


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर दुसऱ्या लाईनची तार पडल्याने शहरातील शिवाजीनगर परिसरासह शहरातील कित्येक घरांतील टीव्ही, फ्रीज आदी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे जळाली आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील शिवाजीनगर परिसरात 132 लाईनचे काम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास शहराला वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर 11 केव्हीची तार पडली. यामुळे विजेचा प्रवाह अचानक वाढला. यामुळे शिवाजीनगर परिसरातील घरांतील टीव्ही, फ्रीज, एसी आदी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे जळाली आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शनिवारी दिवसभर शहरात वीजपुरवठा खंडित होता, सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर काहीच क्षणात ही घटना घडल्याने शहरावर पुन्हा अंधार पसरला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई संबंधित ठेकेदार अथवा महावितरणने द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.