सारसनगर परिसरात दोन गटात राडा,दुचाकी वाहने,रस्त्यावरील पथदिवेही फोडले!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील सारसनगरच्या पावन गणपती मंदिराजवळ दोन गटात वाद होवून त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आले. यावेळी परिसरातील काही दुचाकी वाहने फोडण्यात आली तर रस्त्यावरील पथदिवेही फोडण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सारसनगर परिसरात काही युवकांमध्ये रविवारी रात्री वाद झाले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास पावन गणपती मंदिराजवळ तरुणांचा जमाव गोळा झाला व वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. यावेळी दोन्ही गटांकडून दगड फेकण्यात आले, तर एकमेकांना लाकडी दांडक्याने मारहाणही करण्यात आली. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली. 

यावेळी काही तरुणांनी परिसरातील दुचाक्यांचे नुकसान केले तर रस्त्यावरील पथदिवे फोडली. या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून अनेक तरुण तेथून पसार झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.