प्रकृती अस्वास्थ्यामुळे आमदार संग्राम जगताप आठवडाभरापासून औरंगाबादच्या रुग्णालयात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी असल्याने न्यायालयीन कोठडीत असलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांना गेल्या आठवडाभरापासून औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


गेल्या दिड महिन्यापासुन अटकेत असलेले आ.जगताप यांच्या पोटात दुखत असल्याने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर येथील मेडिसिन विभागात उपचार सुरू आहेत.

केडगाव मनपा पोटनिवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी सेनेचे शहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती,या प्रकरणात सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोणताही सहभाग न आढल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला.

आमदार जगताप यांच्या बद्दल खून प्रकरणी पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत, जोपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत जामीन न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याने आणि जामिनासाठी अर्ज न केल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.त्यामुळे त्यांना हर्सुल (औरंगाबाद) कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, किडनीत पाण्याची गाठ तयार झाली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले, काही दिवसांपासून ते पोटदुखीने त्रस्त होते. हा आजार जास्त बळावल्याने गेल्या सोमवारी त्यांना घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.