श्रीरामपूर मध्ये खून झालेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे चारीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ती व्यक्ती श्रीरामपूर शहरातील अतिथी कॉलनीमध्ये राहात असलेल्या झेवियर गॅस्पर नोएल (वय ३२) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील वडाळा महादेव येथील चारीमध्ये एका तरुणाचा खून करून मृतदेह टाकलेला होता. त्याच्या शरिरावर तीक्ष्ण हत्याराने खून केल्याच्या खुना होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

काल या तरुणाचे वडील त्याच्या हरविल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आले होते. तेथे फोटो पाहून त्यांनी तो त्यांचा मुलगा असल्याचे ओळखले. ओळख पटल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेवाळे हे पुढील तपास करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.