संगमनेरमध्ये पाण्याच्या वादातून पती-पत्नीवर कोयत्याने वार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे पाट पाण्याची पोटचारी का उकरली असे म्हटल्याच्या वादावरुन तिघा जणांनी पती व पत्नीवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार दि. २६ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुकाराम वाळीबा कडलग (वय-५०) हे आपल्या कुटुंबासोबत जवळे कडलग याठिकाणी राहत आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते ऊसाच्या शेताकडे पाणी भरण्यासाठी चालले होते.

त्यावेळी रमेश निवृत्ती वामन, मनिषा रमेश वामन व जयेश रमेश वामन या तिघांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून ते म्हणाले की, तु पाट पाण्याची पोटचारी का उकरली असे बोलण्याच्या झालेल्या वादातून वरील लोकांनी कडलग यांच्या डोक्यावर व खांद्यावर कोयत्याने वार केले. 

त्यावेळी त्यांची पत्नी शारदा ही सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आली असता तिच्याही डोक्यावर वार केले व दोघा पती व पत्नीला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कडलग दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.