नगर-सोलापूर रोडवर १२ लाखांचा गांजा जप्त !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला येथे जामखेडहून नगर शहरात येणारा ६३ किलोचा सुमारे ११ लाख ७१ हजार १२० रुपयांचा गांजा भिंगार कॅंप आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोटारीसह जप्त करत दोघांना अटक केली आहे. सादीक सुभान शेख (वय २५, रा. रमाजीनगर, केडगाव) व अशीष अरूण आडेप (रा. चितळे रोड, नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी राजेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅंप पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.