रायसोनी पतसंस्थेविरुद्ध २१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : ठेव पावती ठेवूनही ती रक्कम वेळोवेळी मागणी करुनही परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अरुण वामन ठाकूर (रा. बालिकाश्रम रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. रायसोनी पतसंस्थेच्या सावेडी शाखेत हा प्रकार घडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण वामन ठाकूर यांनी स्वत: व पत्नीच्या नावावर रायसोनी पतसंस्थेत २१ लाख ५३ हजार रुपयांची ठेव ठेवली होती. ही ठेव २०१३ मध्ये ठेवण्यात आली. ठेवीची मुदत संपल्यानंतर ही रक्कम पतसंस्थेकडे मागण्यात आली. मात्र, वेळोवेळी रक्कम मागूनही ती परत करण्यात आली नाही.

परिणामी पतसंस्थेकडून फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठाकूर यांनी २१ लाख ५३ हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पोलिसांनी भादंविकच्या ४२०, ४०६, ४०९ व ३४, १२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पो. नि. प्रकाश पाटील हे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.