महिलेच्या विनयभंगप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरालगत असणाऱ्या वेल्हाळे शिवारातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पती व पत्नीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना शुक्रवार दि. २५ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेल्हाळे परिसरात ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नितीन भास्कर जेडगुले हा तिच्या घरी आला व त्याने महिलेला थंड पेय दिले. ते पिल्यानंतर महिलेला झिंग येऊ लागल्याने जेडगुले याने लज्जा निर्माण होणारे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. 

त्यानंतर जेडगुले याच्या पत्नीनेही आपल्या नवऱ्याचीच पाठराखण करत पिडीत महिलेस अश्लील व वाईट शिविगाळ केली. त्यामुळे याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील दोन्ही पती-पत्नी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी.बी.देशमुख हे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.