काष्टी-श्रीगोंदा रस्त्यावर उसाच्या शेतात आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काष्टी-श्रीगोंदा रस्त्यावर एका उसाच्या शेतात आठ वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी आढळून आला. तालुक्यातील काष्टी शिवारात मोहन दांगट यांच्या शेतात मृतदेह आढळला असून या मुलाच्या अंगात टी शर्ट आणि पँट आढळून आली. मुलाच्या शरिरावर इतर कुठेही जखमा नसल्या तरी गळ्याभोवती काळे व्रण आढळून आले आहेत.


घटनास्थळी त्या मुलाची चप्पल आढळून आली आहे. या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार असले तरी या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही,उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पुण्यात ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.