बेकायदेशीर व्हिडिओ गेम पार्लरवर छापा,जुगार खेळणाऱ्यास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विनापरवाना व्हिडोओ गेम पार्लर चालवत पैसे घेवून जुगार खेळणाऱ्या एका जणास ताब्यात घेण्यात आले असून या छाप्यात सात व्हिडीओ मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार दि. २४ रोजी सहा. पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भिंगार शहरात पाण्याच्या टाकीखाली एम.जी.रोड येथे पत्र्याच्या शेडमध्ये नितीन कान्होबा घोडके (वय ३६, रा.ठुबे मळा, देवी रोड, केडगाव) हा लोकांकडून पैसे घेवून व्हिडिओ गेम पार्लरवर मशिनवर विनापरवाना बेकायदेशिररित्या जुगार चालवत आहे.

त्यानूसार  शुक्रवार दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता घोडके याच्या व्हिडिओ पार्लरची कागदपत्रांची खात्री केली असता त्याच्याकडे कोणताही व्हिडिओ गेम पार्लर चालविण्याचा परवाना मिळून आला नाही. तसेच सदर मशिन बिंगो जुगारा सारख्याच असून, त्यावर जुगार लावला जातो, असे खात्री झाल्याने व्हिडिओ पार्लरच्या ७७ हजार रुपये किंमतीच्या ७ मशीन जप्त करून कॅम्प पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करून घोडके यास अटक करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.