रिक्षाचालकाने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ येथील रिक्षाचालक अप्पासाहेब नारायण वेताळ (वय ४५) यांनी राहात्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

गुरूवारी रात्री काम आटोपल्यानंतर वेताळ अकराच्या सुमारास घरी गेले. त्यानंतर त्यांनी घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील रहिवाशांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी रिक्षाचालक वेताळ यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------



Powered by Blogger.