नेवासे तालुक्यात चुलतभावानेच केला मुलीचा विनयभंग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्यातील एका गावात चुलतभावानेच अल्पवयीन बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. पीडित मुलीने याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कि , तेरा वर्षांची ही मुलगी २३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता घरी एकटी असताना त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या चुलतभावाने संधीचा फायदा घेत ही मुलगी झोपलेली असताना तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिने विरोध केला असता त्याने तिला दम दिला. मात्र, त्याचवेळी मुलीचे वडील घरी आल्याने त्या तरुणाने तेथून पळ काढला. झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर चुलतभावाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.