शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक !


> अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील चांदा येथील मंगल दीपक शिंदे यांचा ग.नं.११८/१/ड मधील चार एकर ऊस व ठिबक संच शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाले.डॉ.शिंदे यांच्या उसाला आग लागल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना समजताच मदतीला बरेच जण धावून आले व त्यांनी धावपळ करून बरीच आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत एक ते दीड एकर ऊस ठिबक आगीच्या भक्षस्थानी पडले होते. 

रात्रीची वेळ असल्याने आग विझवून परिसरातील शेतकरी युवक घरी गेले होते त्यानंतर लाईट आल्यानंतर पुन्हा शॉर्टसर्किट झाले व उसाने पुन्हा पेट घेतला. लगेच मोबाइलवर अनेकांना ही बातमी पसरली व अनेक शेतकरी तरूणांनी आग आटोक्यात आणली. तोपयंर्त दोन एकर ऊस व ठिबक आगीच्या भक्षस्थानी पडले असा एकूण चार एकर ऊस ठिबक जळून अंदाजे जवळपास सहा लाख रुपयाचे नुकसान झाले.

वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन २०१५ मध्ये शिंदे यांचा पाच एकर ऊस जाळला होता. त्यावेळेस देखील १० लाखांचे नुकसान झाले होते. उसाला आग लागली त्यावेळी डॉ. शिंदे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परिसरातील ५० ते ६० शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धावपळ करून आग विझवली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.