पारनेर मध्ये विहिरीचे काम चालू असताना कामगाराचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील माळकूप येथे विहिरीचे काम करताना क्रेनच्या साहाय्याने वर येताना ब्रेकफेल झाल्याने बकेट खाली पडून एकजण ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. 


याबाबत अधिक माहिती अशी की, हरिभाऊ नाबगे यांच्या शेतात विहिरीचे काम चालू आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास चार कामगार जेवणासाठी वर येत असताना अचानक ब्रेकफेल झाला. बकेट कामगारांसह विहिरीत कोसळली. बबन शेलार (वय ५३, गोरेगाव) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. बापूसाहेब महाडुळे (गोरेगाव) जखमी असून नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.