कदम पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल झाल्याने आज देवळाली बंद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे पुत्र देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. नागरिकांनी शनिवारी आठवडे बाजारसह शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून देवळाली प्रवरा परिसरात लोकसहभागामधून ओढ्या-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. नगराध्यक्ष कदम त्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणे असल्यामुळे त्या नागरिकांशी चर्चा करून समेट घडून आणण्यासाठी नगराध्यक्ष किंवा चंद्रशेखर कदम हे नागरिकांच्या विनंतीनुसार जातात.त्यांच्या विरोधात चांगुणाबाई ढूस यांना पुढे करून खोटा अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची चर्चा गुरुवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली.त्यामुळे नागरिकांचा रोष अनावर झाला.

शुक्रवारी सकाळी शेकडो नागरिक व कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांच्या कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी कदम पिता-पुत्रावरील अदखलपात्र गुन्हा मागे घ्यावा, गावातील अवैध दारुविक्री, अवैध सावकारकी, मटका, जुगार आदी धंदे तातडीने बंद करावेत, सार्वजनिक जागेतील अतिक्रमणे तातडीने काढावीत यासाठी शनिवारी देवळाली प्रवरा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.