IPL मधील चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रविवारी अंतिम सामना होताच यंदाचे आयपीएल संपेल. पण IPL सारख्या टूर्नामेंटचे सर्वात मोठे ग्लॅमर काय आहे तर ते आहे चीअरलीडर्स. फलंदाजांनी चौकार- षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजांनी विकेट घेतल्यानंतर मनमोहक नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्स किती पैसे कमवितात आज पाहूयात.

आयपीएलमध्ये सामील होणा-या चीयर्सलीडर्स भारतात सुमारे दोन महिने असतात.या काळात चीयर्सलीडर्स आपल्या संघासोबत क्रिकेटपट्टू प्रमाणे विविध शहरात फिरत असतात. एका सामन्यासाठी प्रत्येक चीयर्सलीडर्सला सरासरी 8 ते 10 दहा हजार रूपये मिळतात. शिवाय राहणे-खाणे सोडून खर्चायला सामन्यागणिक 3000 रूपये भत्ता मिळतो.

अशा पद्धतीने एक चीयर्सलीडर्स आयपीएलच्या एका सत्रात अडीच ते तीन लाख रूपये कमावतात. आयपीएलमध्ये सामील होणा-या बहुतेक चीयर्सलीडर्स परदेशातील असतात खासकरून दक्षिण आफ्रिकेतील मुलींची संख्या जास्त असते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.