डिसेंबर 2019 पर्यंत 5G सेवा भारतात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- इंटरनेटवर डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग करताचा स्पीड कधी कधी अत्यंत कमी वाटतो. पण दिवसागणिक बदलणाऱ्या टेक्नोलॉजीनं त्यावरही उपाय शोधला आहे. येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न आहे. तसं झालं तर डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते. 

मुंबईत झालेल्या 5 जीच्या प्रदर्शनात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जी च्या तुलनेत 5 जीचा डाउनलोड स्पीड किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते. 5 जीमुळे दैनंदिन जीवनात कोणते बदल होतील, याचं प्रेझेंटेशन काल मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झालं. नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केलं.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.