अल्पवयीन मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्या दुकानदारास अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरातील एका शाळेसमोरील दुकानात पुस्तक खरेदीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत दुकानदारास शहर पोलिसांनी अटक केली. संबंधित मुलाच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी राजेश दिगंबर पाठक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता दहावीची नवी पुस्तके आली आहेत का, हे पाहण्यासाठी दुकानात आला होता. शहरातील एका विद्यालयासमोर असलेल्या या दुकानात गेलेल्या या मुलाला दुकानमालक पाठक याने काउंटरच्या आतील बाजूला बोलावत त्याचे नाव, गाव विचारले. भविष्यात तुला पुढे काय व्हायचे, अशी विचारणा करत त्याच्याशी विकृत चाळे त्याने सुरु केले. 

पाच मिनिटांसाठी आत येतोस का, अशी त्याला विचारणा केल्याने या मुलाने तेथून लगेच बाहेर येत आपल्या मित्राला ही माहिती मोबाइलवरुन दिली. मुलाचे मित्र, आई-वडील व नातेवाईकांनी दुकानात येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेत शहर पोलिस ठाण्यात पाठक याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दुकानमालकाला अटक केल आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.