चौकात बोर्ड लावून श्रध्दांजली वाहण्यापेक्षा कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं नगरची आमदारकी द्यावी!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर यांची केडगावात हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर राजकिय पोळी भाजण्याचे सुरु असणारे धंदे बंद करावेत. चौकात बोर्ड लावून श्रध्दांजली वाहण्यापेक्षा कोतकर यांच्या पत्नीस नगर शहराची आमदारकी शिवसेनेनं द्यावी. त्यानंतरच कोतकर कुटुबियांना न्याय मिळेल, असे मत नगर तालुका शिवसेनेचे माजी प्रमुख श्रीराम येंडे यांनी व्यक्त केले आहे.

नगर शहराचे माजी आमदार कै. संजय कोतकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्रध्दांजली वाहताना म्हणाले होते की, कै. कोतकर हे सच्चे शिवसैनिक होते, त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून ३० वर्षे काम केले. मग त्यांच्या कामाची पावती म्हणून अगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीला आमदारकीची उमेदवारी देण्यात यावी, अशी जुन्या शिवसैनिकांची मागणी असल्याचे शिवभक्त श्रीराम येंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे.

पत्रकात येंडे यांनी यासाठी विविध दाखले दिले आहेत. याबाबत त्यांनी कै. राजीव गांधी, नाशिक येथील कै. आमदार हिरे, कै. प्रमोद महाजन, कै. गोपिनाथ मुंडे, कै आर.आर. पाटील, कै. पतंगराव कदम, कै. वनगा तसेच नगर शहरातील प्रभाग ३ मधील कै. अशोक भांगरे आदींंच्या निधनानंतर त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. ही राजकीय परंपरा पाळली जावी, अशी मागणी येंडे यांनी केली आहे.२०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेनं उमेदवारी देत आमदार करण्याची मागणी शिवसैनिकांची असल्याचे येंडे यांनी म्हटले आहे.

नगर शहरातील कै. जगदीश भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीस विधानसभेचे तिकिट देण्याचे सर्वानुमते ठरलेले असताना स्वार्थी भुमिका घेत कोणी ती जागा पदरात पाडली? हा इतिहास मोठा असल्याचा म्हणत तो जनतेसमोर प्रसंग आल्यावर मांडणार असल्याचे म्हटले आहे. तसेच माणसे मेल्यानंतर त्यांच्या सरणावर राजकीय पोळया भाजण्याचे धंदे बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.