शिवसेना जनतेची फसवणूक करतेय - राज ठाकरे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशात इतक्या राज्यांमध्ये किनारपट्टी आहे. मग नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल अशी धमकी कशी काय देतात? असा सवाल राज यांनी केला. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प नको आहे, त्यामुळे तो कुठेही घेऊन जा, धमक्या देऊ नका, असंही राज ठाकरेंनी सुनावलं.

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.शिवसेना एकीकडे प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाल्याची घोषणा करते, तर सरकार हा प्रकल्प पुढे रेटत आहे. त्यामुळे शिवसेना जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही राज यांनी केला.नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे बोलत होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.