महिलेचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील एका महिलेचे अपहरण करत महिलेच्या पतीस खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी एका पिडीत महिलेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीकडून ८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


कोठला स्टॅण्ड परिसरात सापळा लावून आरोपी किरण बाळु उमाप (वय २८, रा. जामगाव रोड, पारनेर) यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किंमतीची कार व पिडीत महिला यांना ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किरण बाळु उमाप (रा. पुणेवाडी, ता. पारनेर) याने १५ मे रोजी एका महिलेचे आळेफाटा परिसरातून अपहरण केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी पारनेर तालुक्यातील गावातील एका इसमास टाकळी ढोकेश्वर येथून एका व्हेंटो कारमधून केडगाव लिंकरोड येथे उमाप याने नेले व तेथे अनोळखी एक मुलगा व महिला यांच्याशी संगनमत करुन सदर इसमास दोन लाख रुपये द्या तेव्हाच तुमच्या पत्नीला सोडतो असे म्हणुन खंडणीची मागणी केली.

उमाप याने महिलेच्या पतीला दि. १७ मे रोजी अप्पु हत्ती चौक, नगर येथे बोलावून पल्सर दुचाकीवरुन नगर शहरात फिरुवून केडगाव शिवारातील आडरानाला घेवून जावून तु आज संध्याकाळपर्यंत खंडणीचे पैसे दिले नाही तुझ्या पत्नीला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.