नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस पलटली, ४० ते ४५ प्रवासी जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-मनमाड महामार्गावरील शिंगवे नाईक परिसरात खासगी लक्झरी बस शुक्रवारी (दि.२५) रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास पलटल्याची घटना घडली असून, यामध्ये ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी बसजवळ धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगवे नाईक शिवारात एक खासगी बस (क्र.पीवाय ०५, ४४९९) या बसवरील चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याने अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच संतोष कोऱ्हाळे, उपसरपंच सुनील जाधव, व ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्यास प्रारंभ केला.

रुग्णवाहिकेस ग्राहकांनी तात्काळ माहिती देत जखमींना नगर येथील जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात पाठविण्यास सुरुवात केली. .यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र सपोनि. विनोद चव्हाण यांनी तत्काळ ही वाहतूक अलीकडे थांबवून एकेरी करत मदतकार्य चालूच ठेवले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.