संदीप वराळ हत्याकांडातील दोन शार्पशुटर अटकेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खून प्रकरणातील गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेले शार्पशुटर सुशील लाहोटी व अनिल चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील खडकवासला भागातून या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली,या गुन्ह्यातील प्रवीण रसाळ,विकास रसाळ,सह इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

दि.२१ जानेवारी २०१७ रोजी संदीप वराळ यांची भरदिवसा दुपारी दोन वाजता निघोज एस.टी. बसस्थानक परिसरातील चौकात निर्घृण हत्या झाली होती. यामध्ये या दोघांचा सहभाग होता.गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते.

----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.