नगरमध्ये भर ग्रामसभेमध्ये महिलेचा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे भर ग्रामसभेमध्ये एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे,छाया बाबासाहेब जरे असे या महिलेचं नाव असून सातबारावरुन परस्पर नाव कमी केल्याच्या कारणामुळे या महिलेने ग्रामसभेत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सिव्हील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार चालू आहेत.

नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आज सकाळी हा धक्कादायक प्रसंग घडला, ग्रामसेवकाच्या अंगावर शाईफेक करत छाया जरे यांनी विषप्राशन केले मात्र तिला अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया हिचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छायाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्‍यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.