प्रवरानगरच्या तरुणाच्या खुनातील फरार आरोपीस अखेर अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रवरानगर येथील नरेंद्र राजेंद्र भोसले याचा खुन करून फरार झालेला आरोपी लाला भोसले यास लोणी पोलिसांनी संगमनेर येथे पाठलाग करून जेरबंद केले.राहता तालुक्यातील प्रवारानगर येथे १७ तारखेस मागील वादाच्या कारणावरून नरेंद्र राजेंद्र भोसले या युवकाचा पोटात चाकु खुपसून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

या घटनेनंतर सहा दिवसांनी नरेंद्र भोसले याचा प्रवरा रुग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी लोणी पोलिसात ठिय्या मांडला होता. आरोपीस अटक होईपयंर्त मयताचे पोस्टमार्टम न होऊ देण्यावर नातेवाईक ठाम होते. त्यामुळे लोणी पोलीसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. 

पोलीस आरोपीच्या मागावर असताना तो संगमनेर येथे असल्याची खात्रीलायक व गोपनीय माहिती मिळाल्याने लोणी पोलिसांनी त्याचा संगमनेरमध्ये कसून शोध घेतला. संगमनेर येथील नवीन नगर रोड परिसरात त्याचा पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. लोणी पोलिसात याबाबत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.